परि. पोलीस उपअधिक्षक कल्पना अंबादास पवार यांची पुन्हा अवैध वाळु वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई- १४ लाख ४५ हजार रुपयांचा मुददेमाल केला जप्त.

टाकळीभान प्रतिनिधी-मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक श्रीमती कल्पना अंबादास पवार मॅडम यांनी श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर पुन्हा अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई केली आहे.
दि २९/०९/२०२६ रोजी ११/२० वा. प्रशि. पोलीस उप अधीक्षक श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी व पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमध्ये कारेगाव शिवारात, ढोकणे वस्ती, कारेगाव ते श्रीरामपुर जाणारे रोडवर वाळु वाहतुक करणारा टेम्पो पकडला आहे. टेम्पो चालक विजय राजु मोरे, वय २५ वर्ष, रा. कांदा मार्केटजवळ, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर यास ताब्यात घेऊन त्याचेकडील अशोक लेलंड कंपणीची गाडी क्र. MH १९ CY ६६३७ व त्यामधील १ ब्रास वाळ असा २, ०५, ०००/- किंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यास गु र नं ३९०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि ३०/०९/२०२६ रोजी १५/०० वा. प्रशि. पोलीस उप अधीक्षक श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी व पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमध्ये भेर्डापूर शिवारात, प्रवरा नदीकाठी अवैध वाळू साठा जप्त केला आहे. अज्ञात आरोपींनी प्रवरा नदीकाठी ठिक ठिकाणी केलेला २,१०,००० रु किंमतीचा ३५ ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यास गु र नं ३९४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), पर्यावरण संरक्षण अधिनियम ३, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १३/१०/२०२६ रोजी सकाळी ०९/४५ वा. परि. पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार मॅडम यांनी व पोलीस पथकाने खानापुर शिवारात, गोदावरी नदीपात्रात अवैधपणे वाळू उत्खनन करुन विना नंबरच्या सोनालीका ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये वाळु भरणारे वाहनावर कारवाई केली आहे. सदर कारवाईत ३,००,०००/- रु किंच्या सोनालीका ट्रॅक्टर चालविणारा अज्ञात चालकाविरुध्द श्रीरामपुर तालुका पो स्टे गु र नं ४१९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
४) दि १४/१०/२०२६ रोजी रात्री ०२/०० वा. प्रशि. पोलीस उप अधीक्षक श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी व पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमध्ये वांगी शिवारात, प्रवरा नदीपात्रात अवैध वाळु उत्खनन व वाहतुक करणारा टेम्पो पकडला आहे. सदर कारवाईत टेम्पो क्र. MH १७ AG ५६६० व त्यामधील १ ब्रास वाळ व एक मोटारसायकल असा २, २०, ०००/-रु किंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनोळखी ३ आरोपीविरुध्द श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यास गु र नं ४२०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), पर्यावरण संरक्षण अधि का क ३, १५ प्रमाणे गुन्हा करण्यात
५) दि १६/१०/२०२६ रोजी २१/१५ वा. प्रशि. पोलीस उप अधीक्षक श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी व पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमध्ये भामाठाण शिवारात, गणेश बनसोडे यांचे वस्तीजवळ, भामाठाण ते मुठेवाडगावकडे जाणारे रोडवर वाळु वाहतुक करणारा टेम्पो पकडला आहे. टेम्पो चालक प्रमोद जालींदर चांदणे, वय २१ वर्ष, रा. वडाळा महादेव, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर यास ताब्यात घेऊन त्याचेकडील अशोक लेलंड कंपणीची गाडी क्र. MH २३ AU २९३१ व त्यामधील १ ब्रास वाळु असा ५, १०, ०००/- किंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यास गु र नं ४२४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच यापुढेही परि. पोलीस उप अधीक्षक कल्पना पवार मॅडम व श्रीरामपुर पोलीस हे अवैध वाळु उत्खनन, वाहतुक व अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करणार असुन वाळू तस्करांवर हद्दपार, एम पी डी ए कायदयाप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करणार आहे.
वरील कारवाई ही मा. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, मा जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मा. परि. पोलीस उपअधीक्षक श्रीमती कल्पना पवार मॅडम, पोउपनि सतिश डोले, सफौ अर्जुन बाबर, पोहेकों रामेश्वर डोकणे, पोकों विठ्ठल थोरात, पोकों अमोल जाधव, होमगार्ड हरीष चव्हाण, यांनी केलेली आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर





