प्रकाश क्षीरसागर यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
:पुणे :खडकी रेल्वे पोलीस लाईन बॉईज प्रकाश गोरख क्षीरसागर यांना १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती मिळाली आहे. सध्या ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाकड वाहतूक विभागात कार्यरत आहेत.
क्षीरसागर यांच्या बढतीमुळे त्यांच्या पोलीस सेवेतील कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांकडून अभिनंदन केले जात असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
कर्तव्यनिष्ठा, मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल प्रकाश गोरख क्षीरसागर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील पोलीस सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
— पत्रकार उमेश कुलकर्णी
: ९८२२५४८४२९





