केतन अग्रवाल हत्याकांडात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती; ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
पुणे : मावळ तालुक्यातील लोहगड किल्ला परिसरातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याचे वृत्त आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना हत्या व गुन्हेगारी कटाच्या आरोपांखाली अटक करण्यात आल्याची माहिती आहे. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे केतनच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याची आशा व्यक्त होत असून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानल्याचे वृत्त आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 32






