कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीला बहुमत; १६ जागांवर विजयाचा दावा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १६ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, महायुतीला ९ जागांवर समाधान मानावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू होत्या. या निवडणुकीत सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या आघाडीला मतदारांनी साथ दिल्याने महायुतीसमोर आव्हान उभे राहिल्याचे चित्र या निकालातून दिसत आहे.
गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. या निकालामुळे आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी






