मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी, शेतीचे नुकसान अन् कर्जाचा ताण; नांदेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या


मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी, शेतीचे नुकसान अन् कर्जाचा ताण; नांदेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड : शेतीतील नुकसान, आर्थिक अडचणी आणि मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या फीचा वाढता ताण यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नांदेड तालुक्यातील बोरगाव येथे घडल्याची माहिती समोर आली आहे. शंकर क्षीरसागर (वय ४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर क्षीरसागर हे अल्पभूधारक शेतकरी होते. पावसात पडलेल्या खंडामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यातच मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या फीची जबाबदारी आणि आर्थिक अडचणी यामुळे त्यांच्यावरील ताण वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केल्याची माहिती आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी कर्जमाफी आणि शिक्षण शुल्क माफीसंदर्भातील शासनाच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
शेतीतील अनिश्चितता, वाढता आर्थिक भार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च यांसारख्या प्रश्नांमुळे शेतकरी कुटुंबांसमोर उभ्या राहणाऱ्या अडचणी या घटनेच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
पत्रकार : उमेश कुलकर्णी


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!