सांगली जिल्ह्यात २२ ऑक्टोबरपासून ‘एफएफएस’ प्रणालीद्वारेच होणार खत विक्री; जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांचे शेतकऱ्यांना आवाहन


सांगली जिल्ह्यात २२ ऑक्टोबरपासून ‘एफएफएस’ प्रणालीद्वारेच होणार खत विक्री; जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांचे शेतकऱ्यांना आवाहन

सांगली : सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जिल्ह्यात येत्या २२ ऑक्टोबरपासून रासायनिक खतांची विक्री पूर्णपणे ‘एफएफएस’ (FFS – Fertilizer Functionality System) प्रणालीद्वारे केली जाणार आहे. खत विक्रीची ही प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू होत असून, जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या नवीन प्रणालीचा वापर करूनच खत खरेदी करावी, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
खत खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आणि फायदे :

• पारदर्शक विक्री: या डिजिटल प्रणालीमुळे खतांचा काळाबाजार रोखण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना योग्य दरात खते मिळतील.

• खतांची उपलब्धता समजणार: शेतकऱ्यांना कोणत्या दुकानात किती खताचा साठा उपलब्ध आहे, याची अचूक माहिती मिळू शकेल.

• अनिवार्य नियम : २२ ऑक्टोबरनंतर जुन्या पद्धतीने किंवा विना-प्रणाली खत खरेदी-विक्रीस परवानगी नसेल,त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेणे आवश्यक आहे.

प्रशासनाने सर्व खत विक्रेत्यांनाही या प्रणालीचा काटेकोर वापर करण्याचे आदेश दिले असून, शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना केंद्रांवर सहकार्य करावे व कोणत्याही अडचणीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा.

प्रतिनिधी – संजय कोळी.वळसंग.
७८७५९०३७७७.


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!