पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६: २३ ऑक्टोबर रोजी मतदान; जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांचे आवाहन
सांगली : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडणार आहे.सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांना आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
प्रशासनाकडून निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या सूचनेनुसार मतदान प्रक्रिया खालील पद्धतीने पार पाडली जाईल.
मतदानाची वेळ आणि पद्धत :
• मतदानाचा दिनांक : २३ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार).
• मतदानाची वेळ : सकाळी ८:०० वाजल्यापासून संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत मतदान करता येईल.
• मतदान प्रक्रिया : सर्व अधिकृत मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया राबवली जाईल. मतदारांनी वेळेत उपस्थित राहून शांततापूर्ण मार्गाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व पात्र शिक्षक आणि पदवीधर मतदारांना लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी.वळसंग
७८७५९०३७७७.




