सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या धर्मध्वज पूजनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या धर्मध्वज फडकावण्याच्या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपतींना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनाला गती देण्याच्या दृष्टीने या भेटीला विशेष महत्त्व आहे.
या भेटीप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, मंत्रिमंडळातील सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून दिली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






