*पदवीधर मतदानासाठी 10 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरणार*


*05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक*

*पदवीधर मतदानासाठी 10 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरणार*

जालना, दि.22 (प्रतिनिधी महेंद्र बेराड) :05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक मतदारसंघातील विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त खालील नमूद पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत.

यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, राज्य / केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर खाजगी औद्योगिक संस्थांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदार / आमदार / विधान परिषद सदस्य यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, संबंधित शिक्षक / पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत, त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित मूळ पदवी / पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेले युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र (UDID) हे पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी कळविले आहे.

प्रतिनिधी महेंद्र बेराड


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!