ग्रे – इंडस्ट्रीज कंपनी फसवणूक प्रकरण : श्रीरामपूर पोलिसांचे जनतेला आवाहन,
आरोपीची माहिती देणाऱ्याला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर ,

टाकळीभान प्रतिनिधी-अहिल्यानगर जिल्हयामध्ये अल्पवधीत अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेची लूट करणाऱ्या ग्रो इन्व्हेस्टर कंपनीचा पोलीसांचे अत्यंत सतर्कतेने पर्दाफाश केला आहे व या धाडसी कारवाईमुळे अनेक नागरिकांचे कष्टाचे पैसे त्यांना परत मिळाले असुन अनेक नागरीक सदर फसवणुकीत पैसे बुडण्यापासून वाचले आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांना गोपनिय माहिती मिळाली की, ग्रो इन्व्हेस्टर कंपनी, भोकर, ता. श्रीरामपुर शिवारात अहिल्यानगर व आजुबाजुच्या जिल्हयामध्ये मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवुन सामान्य जनतेकडुन मोठ्या रकमा स्विकारण्यात येत आहे. त्यामध्ये अनेक नागरीक पैसे गुंतवणुक त्यांची फसवणुक होत आहे. अशी बातमी मिळाल्याने कोणतीही तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेवुन श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांनी श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर, यांचे अधिपत्याखाली अपर पोलीस अधीक्षक, कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच श्रीरामपुर तालुका पो.स्टे., व श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर ठिकाणी शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेशीत केले होते.
पथकाने दिनांक २६/१२/२०२५ रोजी नमुद ठिकाणी पंचासह छापा टाकुन संदिपराज मोहिणीबाई कपाटे, वय ३६ वर्ष, रा.हनुमानवाडी, भोकर शिवार, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर याचे वास्तव्याचे ठिकाणी चौकशी करुन सदर ठिकाणीची झडती घेतली असता त्याचे घरामध्ये ९ पासबुक, १० चेकबुक, १ हिशोब नोंदविलेली वही, १ अॅपल कंपनीचा लॅपटॉप, ३ कॉम्युटर स्क्रिन, २ पेन ड्राईव्ह, १ कॅश काऊन्टींग मशीन, २ तिजोरी, ३ वॉकीटॉकी, १ H.H.M.D., व १,०४,६००/- रुपये रोख रक्कम असे मिळुन आले आल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे.
सदर प्रकरणात पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वतः फिर्यादी होऊन श्रीरामपुर तालुका पो.स्टे. गु.र.नं. ०५/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा दाखल होताच आरोपीने कायदेशीर कारवाईच्या भितीपोटी स्वतः त्यापैकी काही ठेवीदारांना ठेवी परत केल्या आहेत. परंतु काही ठेवीदारांच्या ठेवी अदयाप पावेतो परत केलेल्या नाहीत. तसेच आरोपी गुन्हा केले पासुन अदयाप पावेतो फरार आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी १. अमोघ संदिप कपाटे, वय २४ वर्ष, रा. हनुमानवाडी, भोकर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर २. संदिप मोहिनीराज कपाटे, वय ३६ वर्षे, रा. हनुमानवाडी, भोकर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर यांचेबाबत ठोस व खरी माहिती देणाऱ्या नागरिकास श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचेकडुन पोलीस प्रशासनाचे वतीने २५,०००/- रुपये (पंचवीस हजार रुपये) रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास अधिक जलद व प्रभावी व्हावा यासाठी आरोपींबाबत माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे,
जनतेला आवाहन :- माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.माहिती खरी व तपासासाठी उपयुक्त ठरल्यास २५,०००/- रुपये बक्षीस दिले जाईल.
सदर आरोपींकडुन आणखी कोणाचीही फसवणूक झाली असेल तर तात्काळ पोलीसांशी संपर्क साधा. आरोपींना पळून जाण्यास मदत करू नका, आश्रय देऊ नका. अल्पावधीत दुप्पट / तिप्पट परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही योजनेत पैसे गुंतवू नका.
तरी सामान्य जनतेस आवाहन करण्यात येते की, सदर आरोपी विरुध्द काही एक महत्वाची खात्रीशीर बातमी असल्यास आपण त्वरीत खालील पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.पो.स.ई. सतिष डौले, श्रीरामपुर तालुका पो.स्टे.९६६५४३१४१५. , पो.स.ई. चारुदत्त खोंडे, अपर पोलीस अधीक्षक, कार्या. श्रीरामपुर७०२११२७७९४
पो.स.ई. रोशन निकम, श्रीरामपुर शहर पो.स्टे. ७४९९०४६३६४ संपर्क साधावा,
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर







