‎दर गुरुवारी धावणार बस; टाकळीभान येथे उत्साहात शुभारंभ ‎…


‎दर गुरुवारी धावणार बस; टाकळीभान येथे उत्साहात शुभारंभ

‎

‎टाकळीभान प्रतिनिधी : श्रीरामपूर येथून श्री क्षेत्र देवगड संस्थान येथे जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या श्रीरामपूर आगाराने विशेष बससेवा सुरू केली आहे. दर गुरुवारी उपलब्ध होणाऱ्या या बससेवेमुळे श्रीरामपूर, टाकळीभान आणि परिसरातील भाविकांची देवदर्शनासाठी होणारी प्रवासाची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.‎या बससेवेचा प्रारंभ टाकळीभान येथे फटाकडे वाजून उत्साहपूर्ण वातावरणात सद्गुरु किसनगिरीबाबा भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते बसची पुष्पहार घालून पूजन करून नारळ फोडण्यात आले. बसला चालक संजय गायकवाड वाहक श्रीमती माधुरी जाधव व कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोल पटारे यांचा शाल व श्रीफळ सत्कार करण्यात आला.

‎या वेळी विभाग नियंत्रक अहिल्यानगर राजेंद्र जगताप साहेब विभागीय वाहतूक अधिकारी भारती साहेब आगार व्यवस्थापक अनिल बेहरे साहेब स्थानक प्रमुख खेमनर साहेब, खंडीझोड साहेब, फुंदे साहेब कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोल पटारे यांच्या विशेष प्रयत्नाने ही बस सेवा सुरू करण्यात आली,

‎. श्रीरामपूर आगारातून दर गुरुवारी सकाळी ९ वाजता बस देवगडच्या दिशेने रवाना होईल. सकाळी ९.१५ वाजता टाकळीभान बसस्थानकावर आल्यानंतर १०.१५ वाजता श्री क्षेत्र देवगड येथे पोहोचेल. दर्शनासाठी वेळ दिल्यानंतर सकाळी ११.१५ वाजता देवगड येथून ही बस पुन्हा श्रीरामपूरकडे रवाना होणार आहे.

‎श्री क्षेत्र देवगड हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, दर गुरुवारी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. आतापर्यंत खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असलेल्या भाविकांना एसटीच्या या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा सोयीची ठरणार आहे.

‎श्रीरामपूर आगाराने सुरू केलेल्या या बससेवेचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी ह, भ, प, दत्तात्रेय बहिरट महाराज,भाऊ कोकणे, टाकळीभान सेवा सोसायटीचे चेअरमन राहुल पटारे, माजी चेअरमन एकनाथ पटारे, भाजपचे नारायण काळे, अशोक शेळके ,श्रीरामपूर आग्रहाचे कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोल पटारे, अविनाश लोखंडे, विश्व धावपटू भाऊसाहेब गव्हाणे, अनिल बोडखे विक्रम मगर,शिवाजी वखरे,अमोल म्हस्के सुनील बोडखे, आदिनाथ काटे, सुधीर मगर, श्रीकाका गाढे, रोहन रोटे, किरण थोरात, बंडू नाईक, अक्षय कोकणे, सद्गुरु किसनगिरी महाराज भक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते,

प्रतिनिधी:दिलीप लोखंडे,श्रीरामपूर

 

 

‎


85
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!