विक्रोळीतील टागोर नगर येथे बालाजी एंटरप्रायजेसच्या दुकानाला भीषण आग; दुकान जळून खाक


विक्रोळीतील टागोर नगर येथे बालाजी एंटरप्रायजेसच्या दुकानाला भीषण आग; दुकान जळून खाक

मुंबई : विक्रोळी येथील टागोर नगर परिसरात बालाजी एंटरप्रायजेसच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीचे नेमके कारण आणि आर्थिक नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
आगीचे कारण व नुकसानीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


85
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!