युवकांनी विविध क्षेत्रात यश मिळवून गावचा नावलौकिक वाढवावा — मंजाबापू थोरात

टाकळीभान: गावातील तरुणांनी विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन करून गावाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन टाकळीभान सेवा संस्थेचे अध्यक्ष मंजाबापू थोरात यांनी केले. टाकळीभान सेवा संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात निवड झालेल्या तसेच शासकीय सेवेत यश मिळवलेल्या युवकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी किसान सभेच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले प्रगतशील शेतकरी राजेंद्र कोकणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुणे शहर पोलीस दलात निवड झालेले गावचे भूमिपुत्र दीपक ब्राह्मणे व राहुल औटी, पुणे लोहमार्ग पोलीस दलात निवड झालेले प्रमोद कलंके आणि अहिल्यानगर पोलीस दलात निवड झालेले सोपान बनकर यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सेवा संस्थेचे माजी चेअरमन राहुल पटारे, शेतकरी संघटनेचे प्रभारी व प्रवक्ते प्रा. कार्लस साठे, माजी चेअरमन एकनाथ पटारे, उपाध्यक्ष अविनाश लोखंडे, माजी उपाध्यक्ष रोहिदास बोडखे, संचालक विजय कोकणे, शिवाजी पवार, अण्णासाहेब दाभाडे, बापूसाहेब शिंदे, भाऊसाहेब गव्हाणे, सोसायटीचे सचिव रामदास ब्राह्मणे, रघुनाथ शेळके, छोटू बनकर, रवींद्र शिरसाठ, संजय ब्राह्मणे, विजय नारळे आदी उपस्थित होते.
यावेळी निवड झालेल्या पदाधिकारी राजेंद्र कोकणे तसेच यशस्वी युवकांचे सेवा संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश लोखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल पटारे यांनी मानले.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर










