भाजयुमो उद्योग आघाडीच्या शहर कार्यकारिणीची घोषणा; आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान


भाजयुमो उद्योग आघाडीच्या शहर कार्यकारिणीची घोषणा; आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) उद्योग आघाडीच्या नवीन शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. भोसरीचे दमदार हिंदू भूषण आमदार महेश (दादा) लांडगे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
शहरातील तरुणांना उद्योग, व्यवसाय आणि स्टार्टअप क्षेत्रात सक्रियपणे सहभागी करून घेणे, युवकांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे तसेच पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
हा नियुक्ती सोहळा भाजयुमो उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष आदित्य कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव अजित कुलथे, भाजयुमो पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश लालचंद यादव, भाजयुमो जिल्हा सचिव आशिष राऊत आणि भाजप पिंपरी-चिंचवड जिल्हा सचिव गिरीष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी
शहर सचिव : १. प्रविण व्यंकट रणखांबे २. विजय प्रल्हाद सोनवणे ३. आकाश नानासाहेब मोरे४. अभिषेक संभाजी बामणे

शहर उपाध्यक्ष : १ शिवदत्त राजेश जाधव २  अजय संभाजी बामणे ३. दीपराज सतीश गुप्ता

युवकांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन
यावेळी आमदार महेश लांडगे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी औद्योगिक नगरीतील युवकांना एकत्र आणून उद्योजकतेला चालना देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून शहरातील युवकांना उद्योग व व्यवसायाच्या संधींशी जोडण्याबरोबरच सामाजिक कार्य आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 98 22 54 84 29


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!