ठाणे पश्चिमेत महिलेचा टेम्पो धडकेने दुर्दैवी मृत्यू
:
ठाणे, १ मे २०२६: ठाणे पश्चिम येथील माजीवाडा परिसरातील नाशिक महामार्गावर रुस्तमजीजवळ एका महिलेचा भीषण अपघातात मृत्यू झाला. एका टेम्पो चालकाने तिला जोरदार धक्का दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी तीव्र तपास सुरू केला आहे. मृत महिलेची ओळख पटलेली नसली तरी, ती पादचारी असल्याचे सांगितले जात आहे. या परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या जागरूकतेची गरज अधोरेखित झाली आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई
Views: 94










