पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांची वायसीएम रुग्णालयाला भेट.

पिंपरी चिंचवड : डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) व पदव्युत्तर संस्थेला भेट देत विविध विभागांची पाहणी केली.
यावेळी आयुक्तांनी रुग्णालयातील ICU, NICU, मेडिसिन, शस्त्रक्रिया, बालरोग, अस्थिरोग, ENT, डायलिसिस, एक्स-रे आणि USG आदी विभागांचा आढावा घेतला. विविध विभागांतील सुविधा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारपद्धती तसेच आरोग्यसेवेची गुणवत्ता याबाबत त्यांनी माहिती घेतली.
भेटीदरम्यान त्यांनी रुग्ण, त्यांच्या नातेवाईक, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून रुग्णालयातील सेवा व सुविधांबाबत प्रत्यक्ष जाणून घेतले. तसेच नागरिकांना अधिक सक्षम, तत्पर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्तांच्या या भेटीमुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.
प्रतिनिधी : दिलीप लोखंडे श्रीरामपूर.










