पुण्याच्या रस्त्यांवर संतापाची लाट; नराधमांना भर चौकात फाशी देण्याची मागणी
पुणे:पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या काही धक्कादायक घटनांच्या पार्श्वभूमीवर, शहरातील प्रमुख चौकांमध्ये निषेधाचे फलक झळकताना दिसत आहेत.
भर चौकात फाशीची मागणी
शहरात लावण्यात आलेल्या एका बॅनरवर “बलात्कारी नराधमांना एकच शिक्षा, भर चौकात फाशी” असा संतप्त मजकूर लिहिण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हे फलक लावून गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सोशल मीडियावरही पडसाद
या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. “पुण्याच्या रस्त्यांवर संतापाची लाट” या कॅप्शनखाली नागरिक आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी अशा नराधमांना कठोर आणि तात्काळ शासन व्हावे, अशी भावना पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429










