सचिन आपटे यांची कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी निवड
पुणे: कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी मा. श्री. सचिनजी आपटे यांची निवड झाल्याबद्दल ब्राह्मण महासंघाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सचिन आपटे यांची या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाल्याने
पुणे विद्यापीठाजवळील कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयात (कॉसमॉस टॉवर) आज सायंकाळी हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी महासंघाच्या पत संस्थे तर्फे 10 लाखाची FD करण्यात आली आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन lसन्मानित करण्यात आले.
सचिनजी आपटे यांचे योगदान आणि ब्राह्मण महासंघाशी असलेले त्यांचे निकटचे संबंध विचारात घेता, त्यांची ही निवड समाजबांधवांसाठी अभिमानास्पद असल्याचे यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. या सदिच्छा भेटीवेळी ब्राह्मण महासंघाचे प्रमुख पदाधिकारी आनंद दवे, नितीन शुक्ल, उदय कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, विद्या घटवाई , अदिती जोशी स्मिता कुर्वे आणि वृषाली देशपांडे उपस्थित होत्या
या निवडीबद्दल बोलताना महासंघाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “सचिनजींच्या अभ्यासू वृत्तीचा आणि अनुभवाचा फायदा कॉसमॉस बँकेला नक्कीच होईल. त्यांच्या पुढील वाटचालीस ब्राह्मण महासागातर्फे शुभेचा
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429










