पोलीस चौकीशेजारी मोटारसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा.


पोलीस चौकीशेजारी मोटारसायकल चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा.


टाकळीभान प्रतिनिधी — टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे पोलीस चौकीशेजारीच मोटारसायकल चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
आबासाहेब रामचंद्र कांगुणे (रा. घुमणदेव, ता. श्रीरामपूर) यांची Hero Honda Passion Pro काळ्या रंगाची मोटारसायकल (क्रमांक एमएच १७ बीजे ८३०५) सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास टाकळीभान पोलिस चौकीच्या बाजूला उभी करण्यात आली होती. काही वेळाने परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
अज्ञात चोरट्याने मोटारसायकलचे हँडल लॉक तोडून वाहन चोरून नेल्याची माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस चौकीच्या शेजारीच चोरी झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी Shrirampur Taluka Police Station येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!