मुंबईतील फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्र: प्रशासनाचा क्रांतिकारी निर्णय
मुंबई: मुंबईतील फेरीवाल्यांच्या व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिकेने डिजिटल क्रांती घडवली आहे. उपनगरातील अधिकृत फेरीवाल्यांना QR कोडयुक्त डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे ओळख पडताळणी, नोंदणी आणि नियंत्रण प्रक्रिया सुलभ होईल.
योजनेचे वैशिष्ट्ये
प्रत्येक नोंदणीकृत फेरीवाल्याला QR कोड असलेले ओळखपत्र.
स्कॅन केल्यावर तत्काळ माहिती: नाव, नोंदणी क्रमांक, व्यवसाय प्रकार आणि परवानगी तपशील.
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी, ज्यामुळे शहरातील पदपथ व्यवस्थापन सुधारेल.
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई: अधिकृत-अनधिकृत फरक पटकन, नियमभंगावर त्वरित अंकुश.
पारदर्शकता वाढ: डिजिटल डेटाबेसमुळे प्रशासनिक कार्यक्षमता वाढेल.
वाहतूक-सार्वजनिक जागा नियोजन: पदपथ आणि रस्त्यांचे प्रभावी व्यवस्थापन शक्य.
ग्राहक सुरक्षा: अधिकृत विक्रेत्याची खात्री, विश्वास वाढेल.
हा निर्णय फेरीवाला व्यवस्थापनाबरोबरच बांगलादेशी घुसखोर आणि परप्रांतीयांवर लक्ष केंद्रित करणारा ठरू शकतो. QR-आधारित नोंदणीमुळे बेकायदेशीर वास्तव्य ओळखणे सोपे होईल, अशी चर्चा सुरू आहे.
या निर्णयामुळे मुंबईच्या फेरीवाला संस्कृतीला आधुनिक चेहरा मिळेल आणि शहर व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित होईल.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429









