डहाणू-दिवा लोकलमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान? रेल्वेतील जाहिरातीमुळे नवा वाद


​डहाणू-दिवा लोकलमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान? रेल्वेतील जाहिरातीमुळे नवा वाद

​मुंबई:मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेमध्ये भाषेवरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डहाणू-दिवा लोकल ट्रेनमध्ये लावण्यात आलेल्या एका जाहिरातीमध्ये मराठी भाषेऐवजी इतर भाषेला प्राधान्य दिल्याचे दिसून येत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

​डहाणू-दिवा लोकलच्या डब्यांमध्ये ‘सुभेदार रामजी सकपाळ अग्निवीर तालीम योजना’ या संदर्भातील माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात धावणाऱ्या या ट्रेनमध्ये ही संपूर्ण माहिती गुजराती भाषेत छापण्यात आली आहे. रेल्वेतील या जाहिरातीमुळे “मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात आहे का?” असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

​महाराष्ट्रातील स्थानिक प्रवाशांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक प्रवास करतात, अशा वेळी माहिती मराठीत असणे आवश्यक होते. जाहिरातींवरील भाषेच्या या निवडीमुळे रेल्वे प्रशासनाच्या धोरणावर आणि जाहिरातदारांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

​सोशल मीडियावर देखील या जाहिरातीचे फोटो व्हायरल होत असून, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. यापूर्वीही रेल्वे स्थानकांवरील फलकांवरून भाषेचे वाद समोर आले होते, आता लोकलच्या आतील जाहिरातीमुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!