दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; आज दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज, ८ मे रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल. निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी ११ वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची सविस्तर आकडेवारी घोषित केली जाईल.
फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या या परीक्षेच्या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष लागले आहे.
Views: 86






