गुजरात मधील विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता ‘मोदी तत्त्व’ आणि ‘आरएसएस’चा इतिहास
वडोदरा: गुजरातच्या वडोदरा येथील नामांकित महाराजा सयाजीराव विद्यापीठाने (एमएसयू) आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने एकूण ४ नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी दिली असून, यामध्ये राजकीय आणि सामाजिक इतिहासाशी संबंधित विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
विद्यापीठाने आपल्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘करिश्माई नेतृत्वा’वर आधारित ‘मोदी तत्त्व’ नावाचा एक विशेष विभाग समाविष्ट केला आहे. यासोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) इतिहासावरील एका स्वतंत्र धड्याचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रात या बदलामुळे नवीन चर्चेला उधाण आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानात भर घालण्यासाठी आणि समकालीन नेतृत्वाचा अभ्यास करण्यासाठी हे बदल केल्याचे समजते. विद्यापीठाने मंजूर केलेले हे नवीन अभ्यासक्रम लवकरच लागू केले जाणार आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429





