खा..निलेश लंके यांची प्रकृती अचानक खालावली; पुढील उपचारासाठी पुण्यात हलवले.


प्रतिनिधी अहिल्यानगर: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा..नीलेश लंके यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन ते तीन दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज प्रकृती अधिक बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारांसाठी त्यांना तातडीने Pune येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू करण्यात येणार असून, त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती अद्याप समोर आलेली नाही.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!