टाकळीभान प्रतिनिधी – घोगरगाव ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील घोगरगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सन २०२५-२६ इयत्ता दहावीचा निकाल ९६ टक्के लागला आहे. विद्यालयाने यशाची गौरवशाली परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. मेघळे गायत्री विठ्ठल हिने ८६.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. पटेल तैबा अरीफअली हिने ८३.६० टक्के, चि. खंडागळे साथक संदीप याने ८३.४० टक्के, कु. पठाण सोफी रशिद हिने ८२.६० टक्के, कु. पहाड अंजली गोविंद हिने ८२.६० टक्के, कु. शेख मुबशरा शहाजान हिने ८०.६० टक्के, कु. पवार सिद्धी अशोक हिने ८०.२० टक्के गुण मिळवले.
तसेच चि. राशिनकर रोहित बाबासाहेब याने ७९.२० टक्के, चि. नरोडे ओम दत्तात्रय याने ७९.०० टक्के, चि. राऊत अतुल भरत याने ७८.४० टक्के, कु. मुलमुळे गायत्री कानिफनाथ हिने ७५.०० टक्के आणि कु. राठोड श्रीलेखा अमोल हिने ७४.६० टक्के गुण मिळवत यश संपादन केले.
या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगे पाटील, उपाध्यक्ष स्नेहल दीदी घाडगे, विश्वस्त चेतन पाटील चव्हाण यांच्यासह संस्थेतील सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य संतोष जावळे, विभाग प्रमुख संदीप काळे तसेच नितीन साळवे, अर्चना जगताप, मनीष वेताळ, रेखा दिवे, विकास कौटे, हरिश्चंद्र डिके, अमोल बहिरट, वनिता नाणेकर, नंदिनी सरोदे, महेश सरोदे, संभाजी गारुळे, ललिता गारुळे, कृष्णा शिंदे, अश्विनी खुरुद, मयुरी राऊत, अमोल तांबे, संदीप कांबळे, स्वाती कांबळे, तुषार सवाई, वसतिगृह विभाग प्रमुख रवी कोरडे, श्रीमती गीतांजली गवारे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि घोगरगाव ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.








