पुण्यातील लाचखोर पोलिस अखेर निलंबित!
पुणे : लाच घेण्याच्या दोन गंभीर प्रकरणांमध्ये पुणे पोलिस दलातील दोन अधिकारी-कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. अति भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून या दोघांना रंगेहाथ पकडले, ज्यामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
एपीआय वैशाली तोटेवार (आर्थिक गुन्हे शाखा): जमिनीच्या चौकशीप्रकरणात ३० लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी २८ लाख रुपये घेताना बंडगार्डन परिसरातील हॉटेलमध्ये ACB ने तिला पकडले. तिची अलीकडील पदोन्नती आणि मुंबई बदलीचा आदेशही रद्द करण्यात आला.
पीएसआय मनोज बरूरे (लोहगाव पोलिस ठाणे): १७ वर्षीय मुलाच्या अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजारांची लाच मागितली व घेताना ठाण्यातच ACB च्या जाळ्यात अडकले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार ४ मे २०२६ रोजी ही निलंबने झाली. ACB ने १ आणि २ मे रोजी सलग दोन कारवाया करून या प्रकरणांची सुरुवात केली होती. या घटनांमुळे पुणे पोलिस दलातील भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलली जात असल्याचे संदेश मिळत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822648429








