अजब घटना: चोरी करायला घुसले, पण जीव वाचवण्यासाठी चोरांनीच बोलावली पोलीस!


अजब घटना: चोरी करायला घुसले, पण जीव वाचवण्यासाठी चोरांनीच बोलावली पोलीस!

ओडिशातील राऊरकेला येथे घडलेली ही घटना धक्कादायक आणि मजेशीर आहे. सोन्या-चांदीचे दागिने चोरण्यासाठी घरात घुसलेल्या दोन चोरांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांना मदत मागावी लागली!
माहितीनुसार, रात्री उशिरा हे चोर घरात शिरले आणि दागिने चोरले. पण पळ काढण्यापूर्वीच शेजाऱ्याने त्यांच्या हालचाली ऐकल्या. प्रसंगावधान राखून शेजाऱ्याने बाहेरचा दरवाजा बंद करून चोरांना घरात कोंडले.
काही क्षणांत घराबाहेर संतापलेली गर्दी जमली. जीवाच्या भीतीने घाबरलेल्या चोरांनी स्वतः ११२ वर फोन करून पोलिस बोलावले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोघांनाही अटक केली. चोरलेले दागिने हस्तगत झाले असून, तपास सुरू आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी


43
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!