विकास लवांडे शाईफेक प्रकरणावरून राजकारण तापलं; आमदार संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारे यांच्या कृतीचं समर्थन
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदीत झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेवर आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया देताना कीर्तनकार भंडारे यांच्या कृतीचं उघड समर्थन केलं आहे.
जगताप यांनी म्हटलं की, भंडारे यांनी आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त केल्या असून त्यांच्या भूमिकेला आपण समर्थन देतो. वारकरी परंपरेविरोधात कोणीही बोलत असेल, तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून राजकीय व सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक भावना आणि राजकीय भूमिका यावरून राज्यात नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548419









