जालन्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला
जालना: मराठा आरक्षण आणि विविध राजकीय मुद्द्यांवरून नेहमी चर्चेत असलेले ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मनसे कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक करत सुपाऱ्या फेकून जोरदार घोषणाबाजी केली.
या अचानक झालेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून या प्रकरणी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जालन्यातील या घटनेची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










