इंधन बचतीसाठी पंतप्रधानांचे मोठे आवाहन; ‘वर्क फ्रॉम होम’वर भर द्या, पर्यटनाच्या सहली टाळा
नवी दिल्ली:आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. इंधन बचतीसाठी नागरिकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगत पंतप्रधानांनी नोकरी करणाऱ्या वर्गासाठी आणि पर्यटनासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
गुजरातमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, इंधनाचा वाढता वापर कमी करण्यासाठी कंपन्यांनी जास्तीत जास्त ‘वर्क फ्रॉम होम’चा (घरून काम) पर्याय उपलब्ध करून द्यावा. यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन इंधनाची मोठी बचत होण्यास मदत होईल.
सहली रद्द करण्याचे आवाहन
पंतप्रधानांनी नागरिकांना विनंती केली आहे की, सध्याच्या परिस्थितीत अनावश्यक प्रवास आणि पर्यटनाच्या ट्रिप (Trips) रद्द कराव्यात. इंधनाचा वापर केवळ अत्यावश्यक कामांसाठीच मर्यादित ठेवल्यास जागतिक संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्यास प्राधान्य द्यावे.
ट्रिप कॅन्सल करा: सध्याच्या काळात पर्यटनासाठी होणारा इंधनाचा खर्च वाचवण्यासाठी सहली टाळाव्यात.
खाद्यतेल आणि इंधन: खनिज तेलासोबतच खाद्यतेलाचा वापरही काटकसरीने करण्याचे आवाहन.
पश्चिम आशियातील या संकटावर भारत नक्कीच मात करेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










