
टाकळीभान प्रतिनिधी – घोगरगाव येथील राधाकिसन दगडूजी बहिरट यांचे नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. ते मुळा प्रवरा वीज संस्थेच्या अकाउंट विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, दोन पुतणे, सुना, दोन बहिणी, नाती व नातवंडे असा मोठा परिवार आहे. साहित्यिक अनिल बहिरट यांचे ते वडील होत. तसेच भाऊसाहेब (काका) बहिरट यांचे ते थोरले बंधू होते.
राधाकिसन बहिरट यांचा स्वभाव मनमिळावू व प्रेमळ होता. त्यांच्या निधनाने घोगरगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर
Views: 74










