टाकळीभान येथे उद्या छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन


टाकळीभान येथे उद्या छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन.

टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथे गुरुवार दि. १४ रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात आली आहे.

गुरुवारी सकाळी ९ वाजता धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.२० वाजता स्टॅन्ड परिसर, पोलीस स्टेशनसमोर महाआरती सोहळा आयोजित करण्यात आला असून हा सोहळा ह.भ.प. विश्वनाथगिरीजी महाराज, श्री क्षेत्र घोगरगाव तसेच ह.भ.प. कृष्णा महाराज वाघुले, टाकळीभान यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात टाळकरी मंडळ व बालसमूहाच्या सहभागातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या जयंती उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठाण व टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी : दिलीप लोखंडे, श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!