राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का : सरचिटणीस आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली असून, पक्षाचे सरचिटणीस आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. या धक्कादायक निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे परांजपे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आपले राजीनामा पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवले आहे. राजीनामा दिल्यानंतर आनंद परांजपे यांचा फोन नॉट रिचेबल येत असल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429
Views: 56






