​सोलापूरच्या राजकारणात खळबळ : खासदार प्रणिती शिंदेंची पालकमंत्री जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस


​सोलापूरच्या राजकारणात खळबळ : खासदार प्रणिती शिंदेंची पालकमंत्री जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस

सोलापूर : सोलापूरच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून खासदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यातील श्रेयवादाचा वाद आता थेट कायदेशीर पातळीवर पोहोचला आहे. रस्त्याच्या कामाच्या श्रेयावरून सुरू झालेल्या या संघर्षाने आता नवे वळण घेतले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा आरोप करत खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटिशीत गोरे यांनी सात दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
नोटिशीत नमूद केल्यानुसार, दिलेल्या मुदतीत माफी न मागितल्यास न्यायालयीन कारवाईचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या घडामोडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
रस्त्यांच्या विकासकामांच्या श्रेयावरून सुरू झालेला वाद आता वैयक्तिक प्रतिष्ठेच्या मुद्द्यावर गेल्याने आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापूरकरांचे लक्ष आता जयकुमार गोरे यांच्या भूमिकेकडे लागले आहे.

पत्रकार : उमेश कुलकर्णी
मो. 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!