शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘ब्राह्मण महासंघा’तर्फे गौरव; १७ मे रोजी पुण्यात विशेष सोहळा

पुणे: ब्राह्मण महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, यावर्षीच्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसोबतच शैक्षणिक क्षेत्रातील आधारस्तंभ असलेल्या शिक्षकांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.
शिक्षकांसाठी सन्मानाची संधी
महासंघाने घेतलेल्या निर्णयानुसार, कोणत्याही शैक्षणिक संस्थेत सध्या कार्यरत असलेले संचालक, १० वी व १२ वीचे शिक्षक, प्राचार्य तसेच ज्येष्ठ शिक्षक बंधू-भगिनींचा या कार्यक्रमात जाहीर सत्कार केला जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेण्याच्या उद्देशाने ही नवी परंपरा सुरू करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
दिनांक: १७ मे २०२६
वेळ: सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत
स्थळ: मराठा चेंबर ऑफ कॉमर्स (MCCIA) हॉल, टिळक रोड, पुणे.
या कार्यक्रमात सन्मानित होण्यासाठी इच्छुक शिक्षकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी खालील व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा:
https://chat.whatsapp.com/Ht4bMfgBn7N5JoDvHMq6Mh
अधिक माहितीसाठी श्री. संजय देशमुख (९७६३३११०९४) किंवा सौ. विद्या घटवाई (९८५०६८०९२४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






