पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर फ्रॉडचे वाढते प्रकार; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन


पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर फ्रॉडचे वाढते प्रकार; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पिंपरी चिंचवड येथे सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, अनेक नागरिक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत. अशाच प्रकारची घटना वर्ष 2024 मध्ये श्री. विलास गुलाबराव सोनवणे व सौ. ॲड. स्वप्नाली विलास सोनवणे यांच्या बाबतीत घडल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या प्रकरणी त्यांनी सायबर क्राईम पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, संबंधित घटनेची नोंद करण्यात आली आहे. आपल्या नावाचा अथवा ओळखीचा गैरवापर करून कोणी पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करावे तसेच संबंधितांविरोधात तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, काही फायनान्स कंपन्या जाणूनबुजून व्यक्तीची प्रतिमा नातेवाईक आणि समाजामध्ये मलीन करण्यासाठी विविध प्रकारे दबावतंत्र वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही फोन कॉल, मेसेज किंवा आर्थिक व्यवहारांबाबत सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यासंदर्भात आज पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड पोलीस चौकीमध्ये संबंधित फायनान्स कंपनीविरोधात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एन.सी. दाखल करण्यात आल्याची माहिती श्री. विलास सोनवणे यांनी दिली.
सायबर फसवणूक आणि आर्थिक गैरप्रकारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही संशयास्पद बाब तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे

पत्रकार विजय अडसूळ


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!