संगीतकार गीतकार पलाश यांच्यावर ऍट्रॉ्सिटी दाखल :-


संगीतकार गीतकार पलाश यांच्यावर ऍट्रॉ्सिटी दाखल :-


सांगली 21 मे -सांगली शहर पोलिसांनी संगीतकार-गीतकार पलाश मुच्छल यांच्या मुंबईतील राहत्या घरी छापेमारी केली. मात्र, ते घरी आढळून न आल्याने पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

विज्ञान माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चित्रपट निर्मितीसाठी दिलेल्या २५ लाख रुपयांच्या मागणीवरून पलाश मुच्छल यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नोव्हेंबर २०२५ मध्ये क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या विवाहाची चर्चा रंगली होती. मात्र, हा विवाह नंतर रद्द झाला होता.

या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक संदीप भागवत करत असून, पोलिसांचे पथक पुन्हा मुंबईत शोधमोहीम राबवणार आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!