पुणे आणि पिंपरी-चिंचवडला पावसाचा जोरदार तडाखा; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.


Pune Rain : पुणे आणि पिंपरी-चिंचवडला पावसाचा जोरदार तडाखा; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा


पुणे : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना अखेर पावसाने दिलासा दिला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शहराच्या विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला.
अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहनचालकांची तारांबळ उडाली. काही भागांत वाहतूक मंदावली तर रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांची धावपळ झाली.
दरम्यान, पावसामुळे तापमानात घट झाली असून उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस पुणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

पत्रकार: शाम शिरसाठ पुणे


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!