”घरी बोलावून मंत्री केले, ही माझीच चूक”; उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर बोचरी टीका
मुंबई: शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांच्या राजकीय भूमिकेवर भाष्य करताना ठाकरे यांनी “त्यांना घरी बोलावून मंत्री केले, ही माझीच चूक झाली,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लोभापायी गेले त्यांना जाऊ द्या!
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, जे लोभापायी सोडून गेले आहेत त्यांना जाऊ द्या, त्यांची मला चिंता नाही. विधान परिषदेची आमदारकी आणि मंत्रिपद देऊनही कडू यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरेंनी ही टीका केली आहे.
प्रहार कार्यकर्त्यांचा ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश
बच्चू कडू यांच्या निर्णयावर नाराज होऊन सोलापूर, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंची साथ सोडली आहे. या कार्यकर्त्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (UBT) पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429





