धारणगांव खडकची कन्या कु. सिद्धी जाधव झाली ‘कृषी अधिकारी’ आजोबांचे स्वप्न नातीने केले पूर्ण; पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश:-


धारणगांव खडकची कन्या कु. सिद्धी जाधव झाली ‘कृषी अधिकारी’ आजोबांचे स्वप्न नातीने केले पूर्ण; पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश:-

जि. नाशिक, ता. निफाड:दि. 23 जून :-धारणगांव खडक (ता. निफाड) येथील कु. सिद्धी शिवनाथ जाधव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नोव्हेंबर २०२४ मध्ये घेतलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवत ‘कृषी अधिकारी’ पदाला गवसणी घातली आहे. धारणगांव खडक परिसरातील ग्रामीण भागातून ही कामगिरी करणारी ती पहिलीच कन्या ठरल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे आपल्या लाडक्या नातीने हे यश मिळवून आजोबांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

 

सिद्धीचे प्राथमिक शिक्षण निफाड येथील सरस्वती विद्यालयात झाले. त्यानंतर ५ वी ते १० वीचे शिक्षण रचना विद्यालय (नाशिक), ११ वी व १२ वी (विज्ञान) केटीएचएम कॉलेज (नाशिक) येथून पूर्ण केले. पुढे तिने के.के. वाघ कृषी महाविद्यालयातून ‘बी.टेक (अ‍ॅग्रीकल्चर)’ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथून ‘एम.टेक’ची उच्च पदवी पूर्ण केली. शासकीय शाळा-महाविद्यालयातून शिकत तिने हे यश खेचून आणले असून, याचे सर्व श्रेय तिने आई-वडील व गुरुजनांना दिले आहे.

सिद्धीच्या या यशाबद्दल धारणगांव खडक व परिसरातुन तिचे कौतुक करून पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. बळीराजाची सेवा करण्याची संधी तिला मिळाली असून, सध्या तिच्यावर संपूर्ण परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!