म्हसळा नगरपंचायततीत आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त महिलांचा सन्मान :-


म्हसळा नगरपंचायततीत आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त महिलांचा सन्मान :-

जि. रायगड, ता. म्हसळा:दि. 23 जून :-दिनांक २३ जून २०२६ आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून म्हसळा नगरपंचायत येथे “एकल महिला दिन” म्हणून आयोजित करण्यात आला.त्या अनुषंगाने महात्मा जोतीबा फुले यांच्या २०० व्या जयंती निमित्त नगराध्यक्ष सुनिल शेडगे, म्हसळा नगरपंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, नगरसेविका सौ. राखी करंबे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना सुपरवायसर साधना प्रसाद पागी यांनी या कार्यक्रमात विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित आणि निराधार महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ याबाबत सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी कार्यक्रमास म्हसळा नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व अशा सेविका यांनी सहयोग घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

पत्रकार :-विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!