डोंबिवलीत संतापजनक प्रकार: उच्चभ्रू सोसायटीत वृद्ध सुरक्षा रक्षकाला रहिवाशाकडून चपलेने मारहाण


​डोंबिवलीत संतापजनक प्रकार: उच्चभ्रू सोसायटीत वृद्ध सुरक्षा रक्षकाला रहिवाशाकडून चपलेने मारहाण

​डोंबिवली: डोंबिवलीतील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. वाहनावर सुरक्षा स्टिकर लावण्याच्या किरकोळ नियमावरून झालेल्या वादात एका उद्दाम रहिवाशाने ५७ वर्षीय वृद्ध सुरक्षा सुपरवायझरला चपलेने बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील ‘कासारिओ पालावा’ सोसायटीत ही घटना घडली. वाहनांच्या सुरक्षेसाठी स्टिकर लावण्याचे नियम पाळण्यावरून वाद झाला. यावेळी कर्तव्यावर असलेले सुरक्षा सुपरवायझर दत्तात्रय गाडेकर यांनी वाहनांची विचारपूस केली असता, आरोपी मोईन तहसीलदार याने त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात आरोपीने गाडेकर यांना चपलेने मारहाण केली.
​या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. एका वृद्ध कर्मचाऱ्याला अशा प्रकारे मारहाण झाल्याने सोसायटीमधील इतर कर्मचाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!