धनादेश प्रकरणातून मंडळाधिकाऱ्याची निर्दोष मुक्तता:-


धनादेश प्रकरणातून मंडळाधिकाऱ्याची निर्दोष मुक्तता:-

जि. हिंगोली. ता.कळमनुरी :दि. 23 मे :-मंडळ अधिकारी उत्तम रतन डाखोरे यांची चार लाख रुपयांच्या धनादेश प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. कळमनुरी न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटला क्रमांक ३५९/२०१९ मध्ये वंदनाबाई दिलीप मामाने यांनी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अक्ट १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आरोपीने चार लाख रुपयांचा धनादेश देऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी उत्तमराव डाखोरे यानी २० एप्रिल २०१९ रोजी हात उसने म्हणून चार लाख रुपये घेतले होते. पैसे परतफेडीच्या खात्रीसाठी त्यांनी २७ मे २०१९ रोजी बँक ऑफ महाराष्ट्र, कळमनुरी शाखेचा चार लाख रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश फिर्यादीने स्टेट बैंक ऑफ इंडिया, आखाडा बाळापूर शाखेत जमा केला असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो १ जून २०१९ रोजी अनादरित होऊन परत आला होता.

या प्रकरणात आरोपीची बाजू अँड. रवि शिंदे यांनी भक्कमपणे मांडली. तर फिर्यादीतर्फ अॅड. शेख आदिल व अँड. पी. के. तडस यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान फिर्यादी वंदनाबाई मामाने या स्वतःचे उत्पन्न तसेच आरोपीला पैसे कोणत्या पद्धतीने दिले याबाबत ठोस पुरावे सादर न झाल्याने न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी उत्तम रतन डाखोरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!