मयत तहसीलदार यांच्या पत्नीला शासनाचा दिलासा :-


मयत तहसीलदार यांच्या पत्नीला शासनाचा दिलासा :-

जि.सांगली.ता. मिरज:दि. 23 मे :-मिरज तालुक्यातील एरंडोली गावचे तथा बीड जिल्ह्यातील केज येथील माजी तहसीलदार स्व. राकेश गिड्डे यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर गिड्डे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू आणि जनसामान्यांशी आत्मीयतेने जोडलेले अधिकारी म्हणून स्व. गिड्डे यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या निधनानंतर पत्नी श्रीमती नेहा गिड्डे यांना अनुकंपा तत्त्वावर सांगली जिल्ह्यात शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेत श्रीमती नेहा गिड्डे यांना सांगली जिल्ह्यात शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.

शासनाचा हा निर्णय गिड्डे कुटुंबासाठी मोठा दिलासा देणारा ठरत आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!