पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात २७ मे ते ९ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू 


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात २७ मे ते ९ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २७ मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार विनापरवानगी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींची गर्दी, मिरवणुका, घोषणाबाजी, शस्त्रे बाळगणे तसेच शांतता भंग होईल असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पत्रकार विजय अडसूळ


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!