पुणे: दर्शनाच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने चोरला तुळजाभवानीचा मुकुट; चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद
पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथून चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरातून देवीचा सुमारे १ किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पुजाऱ्याचे लक्ष विचलित करून डल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात चोरट्याने दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात प्रवेश केला. संधी मिळताच त्याने पुजाऱ्याचे लक्ष विचलित केले आणि गाभाऱ्यातील चांदीचा मुकुट अत्यंत चालाखीने रुमालात लपवून तेथून पळ काढला.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास सुरू
चोरीचा हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429








