डोक्यावर चंद्रकोर असलेल्या ‘या’ बोकडाची किंमत तब्बल ५ लाख रुपये; खरेदीसाठी मुंबई-पुण्यातून ग्राहकांची गर्दी
सांगली जिल्ह्यातील आटपाडी जवळील बाळेवाडी येथील एका बोकडाची सध्या सर्वत्र मोठी चर्चा रंगली आहे. पशुपालक दिगंबर कोळेकर यांच्या मालकीच्या दीड वर्षांच्या बोकडाच्या डोक्यावर नैसर्गिकरीत्या पांढऱ्या रंगाची ‘चंद्रकोर’ उमटली असून, हे या बोकडाचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठी मागणी
मुस्लिम धर्मात चंद्राला अत्यंत पवित्र मानले जाते. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, डोक्यावर चंद्रकोर असलेल्या या खास बोकडाला मोठी मागणी येत आहे. या वैशिष्ट्यामुळे मालकाने या बोकडाची किंमत ५ लाख रुपये ठेवली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून विचारणा
या अनोख्या बोकडाला पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसारख्या मोठ्या शहरांतून ग्राहक संपर्क साधत आहेत. सोशल मीडियावरही या ‘चंद्रकोर’ असलेल्या बोकडाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429







