आमदार संजय गायकवाड यांना मोठा धक्का; प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी चौकशीचे न्यायालयाचे आदेश
बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गायकवाड यांची चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना दिली आहे.
काय आहे प्रकरण?
काही काळापूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. मात्र, आता न्यायालयाने पोलिसांना चौकशीची अधिकृत परवानगी दिल्याने गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता पोलीस याप्रकरणी कशा प्रकारे तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429








