धक्कादायक: प्रसिद्ध रिलस्टार रोहिणी निलेश पारध्ये यांची हॉटेलमध्ये आत्महत्या
मंगळवेढा:सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील रिल्सच्या माध्यमातून लोकप्रिय असलेल्या २५ वर्षीय रिलस्टार रोहिणी निलेश पारध्ये यांनी स्वतःच्या ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी हॉटेलच्या स्वयंपाकघरात घडली. घटनेनंतर पती निलेश यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
रोहिणी पारध्ये यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, त्यांच्या निधनाने सोशल मीडियावरील त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










