कोथरुड ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे ‘भारतरत्न सावरकर’ विषयावर आनंद दवे यांचे व्व्याख्यान
पुण्यात ‘भारतरत्न सावरकर’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन; आनंद दवे मांडणार विचार
पुणे :कोथरुड ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतरत्न सावरकर’ हा या व्याख्यानाचा मुख्य विषय असून, हिंदू महासभा (महाराष्ट्र) अध्यक्ष आनंद दवे हे यावेळी आपले विचार मांडणार आहेत.
हे व्याख्यान बुधवार, २८ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. पुण्यातील श्री राम मंदिर मदन तलाठी पथ राहुल नगर कर्वे नगर पुणे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार, राष्ट्रकार्य आणि सामाजिक योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोथरुड ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
मोबाईल : ९८२२५४८४२९










